राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
89

मुंबई:–राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या असून राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच दिपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे

या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या

1. राजेंद्र भोसले, IAS (2008), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.

2. दिपा मुधोळ मुंडे, IAS (2011) या आधी औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासक, आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.

3. राधाविनोद शर्मा, IAS (2011) या आधी बीडचे जिल्हाधिकारी, आता औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती.

4 सिद्धार्थ सालीमथ, IAS (2011) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.

5 निधी चौधरी, IAS (2012) या आधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी, आता मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली, दीपा मुधोळ- मुंडे नविन जिल्हाधिकारी

बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या 2011 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे.