एमपीएससी : खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा ५ वर्षांनी वाढवली!

0
9

मुंबई- एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या खुल्या वर्गामधील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्षांनी वाढवण्यात आली आहे. मंत्रिंडळाच्या गुरूवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोलिस उपनिरीक्षकासाठी यापूर्वी वयाची अट २८ वर्षांची होती. ती आता ३३ करण्यात आली. तर राजपत्रित अधिकारीपदासाठीही वयोमर्यादा २८ वरून ३३ करण्यात आली. विनायक मेटे तसेच राजू शेट्टी यांनी ही मागणी सरकारकडे केली होती. पोलिस शिपाईपदातही खुल्या वर्गासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा २५ वर्ष होती. ती २८ करण्यात आली आहे.