२९ अपर जिल्हाधिकार्‍यांना आयएएस कॅडर

0
29

गोंदिया-राज्यातील २९ अपर जिल्हाधिकार्‍यांना केंद्र शासनाने आयएएस कॅडर (भारतीय प्रशासकीय सेवा) मंजूर केले आहे. त्यामध्ये सन २0१३ च्या रिक्त पदानुसार १७ तर २0१४ च्या रिक्त पदानुसार १२ अधिकार्‍यांचा समावेश आहे.
राज्य सेवेतून केंद्र शासनाच्या सेवेत आयएएस म्हणून संधी मिळालेल्या अपर जिल्हाधिकार्‍यांमध्ये आर.व्ही. गमे, ए.आर. काळे, के.बी. उमप, ए.जे. सुभेदार, डी.एम. शिंदे, डी.एम. मुगलकर, डी.के. जगदाळे, बी.जी. पवार, एम.जी. अर्डड, ए.बी. यावलकर, एम.बी. गावडे, ए.ई. रायते, डी.बी. गावडे, ए.के. डोंगरे, जी.सी. मंगळे, एन.के. पाटील, आर.व्ही. निंबाळकर यांचा समावेश आहे.
२0१४ च्या रिक्त पदानुसार आयएएस मिळालेल्या अधिकार्‍यांमध्ये जी.बी. पाटील, एम.पी. शंभरकर, एन.ए. गुंडे (एन.एस.खांडेकर), एस.वाय. म्हसे पाटील (एस.ए.आंबेकर), डी.बी. देसाई, आर.बी. देशमुख, आर.एस. जगताप, आर.बी. भोसले, सी.एल. पुलकंडवार, एच.पी. तुम्मोड, एल.एस. माळी आणि एस.के. दिवसे यांचा समावेश आहे. केंद्र शासनाचे अवर सचिव पंकज गंगवाड यांच्या स्वाक्षरीने आयएएस कॅडरचा हा आदेश २९ मार्च रोजी जारी करण्यात आला आहे.