दुष्काळ जाहीर करा.. वामनराव नवले मुख्यमंत्र्यांकडे केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी

0
4

सोलापूर : दि ३०: संघर्ष समिती फुटजवळगांव अध्यक्ष वामनराव नवले समितीची आज बैठकीनंतर वामनराव नवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेकऱ्यांना कर्जमाफी आणि तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली.
वामनराव नवले म्हणाले की, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारच्या धोरणातून होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाबद्दल मी बोलत आहे, देशात कांदा उत्पादन जास्त आहे. तर जगात कांदा कमी आहे. त्यामुळे निर्यातीची परवानगी द्या, अशी मागणी मी सरकारला करणार आहे. मात्र त्यांनी परवानगी द्यावी. यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावू नये या सरकारला मी विनंती करत आहे. कॉर्पोरेट कर आणि उच्च उत्पन्न लोकांचा कर ३० टक्के आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर ४० टक्के कर आहे. हा कुठला न्याय आहे, असा सवाल वामनराव नवले यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुपख्यमंत्री यांना मी पत्र पाठवणार आहे. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा. जनावरांचा चारा, शेतीचं पाणी, पिण्याचे पाण्याचे संकट आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर झाला पाहीजे, महाराष्ट्रातील सरकारने ही मागणी मान्य केली पाहिजे, असे वक्तव्य संघर्ष समितीचे अध्यक्ष वामनराव नवले यांनी केले आहे.