राजेभक्षर जमादार/संख:-रक्षाबंधनानिमित्त उमदी ता.जत पोलिस ठाण्याच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला अनेक पोलिसांनी हजेरी लावत शहरातील भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले. उमदी पोलीस ठाणेकडील महिला व पुरुष अंमलदार / अधिकारी यांनी माझे ठाणे – माझे घर या भावनेने सर्वांनी पोलीस ठाणे हेच माझे कुटुंब असे समजून आज रक्षाबंधन सण आनंदाने साजरा केला
रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधना सारखा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे उमदी येथील काही महिला व महिला पोलिस कर्मचारी यंदाचे रक्षाबंधन पोलीस कर्मचारी व अधिकारी साजरे करण्याचे ठरवले. उमदी येथील पोलिस ठाण्यातील पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलिसांनी आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत, तसेच शस्त्रे, दारूगोळा आदींबाबत या महिलांना माहिती दिली. आम्हाला अनेकदा कामामुळे आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करता येत नाही, आज उमदी पोलीस महिला कर्मचारी आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे केल्याने, आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी साहायक पोलिस निरीक्षक संदिप शिंदे,उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,उपनिरीक्षक शिरीष शिंदे,उमदी पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.