राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

0
25
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 19: शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची  राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

श्री. पटेल हे या पूर्वीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार  म्हणून त्यांची ओळख आहे.

श्री. पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवडबांबूवरील संशोधन तसेच बांबूपासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प पारदर्शी आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून श्री. पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतीलअसा विश्वासही मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.