मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार

0
7

मुंबई, दि.6 : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी एस. चोकलिंगम यांची  नियुक्ती केली.  त्यानुसार  दि. 5 मार्च 2024 रोजी  श्री.चोकलिंगम यांनी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई या पदाचा कार्यभार विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून स्वीकारला.

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, नियुक्त महाराष्ट्र केडरचे आय.ए.एस अधिकारी एस. चोकलिंगम   पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.