57 लाख कुणबी नोदींविरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकीलांवर सरकारचा दबाव, टीपी मुंडेंचा आरोप

0
146
वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाकरीता आंदोलनाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके

ओबीसी आरक्षणाच्या समर्थनात वडीगोद्री येथे हाकेंचे तर पुण्यात एड.ससाणेचे उपोषण आंदोलन सुरु

जालना,दि.१५- शिंदे समितीने दिलेल्या 57 लाख कुणबी नोंदींविरोधात आम्ही केलेल्या याचिकेवर हायकोर्टातील वकीलांवर सरकार दबाव टाकत असल्याचा आरोप ओबीसी नेते टी.पी.मुंडे यांनी केलाय. या दबावामुळे सध्या दिल्लीवरून वकील आणल्याचं देखील ते म्हणाले. दरम्यान, आंदोलनाच्या नावाखाली पैसे घेतल्याचा संशय जरांगेनी व्यक्त केलाय तर त्या लोकांची नावं जरांगेंनी जाहीर करावीत, असं आवाहन देखील टीपी मुंडे यांनी केलंय. अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. या ठिकाणी भेटी दरम्यान मुंडे यांनी सरकारवर आरोप केले आहेत.या आंदोलनाला ओबीसी नेते प्रा.श्रावण देवरे यांनी ही भेट दिली.

मी पहिल्यापासून सांगतोय, पण आज जबाबदारीने सांगतो. या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून काम घेतले असतील? कोणी पैसे घेतले असतील? माझं नाव सांगून का हाेईना. मला ती यादी द्या. माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. मी जबाबदारीने हे सांगत आहे. वेळ आल्यावर तो कोण माणूस आहे, त्याचे नाव देखील घेणार आहे. तो म्हणलाय तर त्याची चौकशी करायची असेल तर करा. त्यामध्ये मी जर असलो तर मलाही सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तर त्यालाही सुट्टी नाही. मला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत.