34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ वाळू चोरट्याची तहसिलदाराच्या वाहनचालकाल मारहाण

वाळू चोरट्याची तहसिलदाराच्या वाहनचालकाल मारहाण

0
890

blank

गोंदिया- जिल्ह्यात वाळू घाट लिलाव बंद आहे. परिणामी अवैध वाळू चोरीला उधान आले आहे. या अवैध वाळू उत्खनन, वाहतुक, विक्रीवर प्रतिबंध बसावा यासाठी धडक कारवाई केली जात आहे.कारवाई दरम्यान आमगाव तहसीलदारांच्या वाहन चालकाला शिवीगाळ, मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

विना परवाना वाळूची वाहुक होताना टिप्पर क’मांक एमएच 35 एजे 2635 तहसीलदार, तलाळ्याने पकडला. यावर कारवाई करून टिप्पर तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी टिप्परमालक विष्णू बर्वे याने तहसील कार्यालयाजवळ तहसीलदार यांचे वाहनचालक राजू पटले यांना बोलावले. ‘तू माझा टिप्पर का पकडला’ असे म्हणून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढच नव्हे तर माझा टिप्पर ज्यांनी पकडला त्या सर्वांना पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी आमगाव पोलिस स्टेशन येथे टिप्पर मालकाविरुद्ध कलम 353, 332, 294 व 506 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आमगाव पोलीस तपास करीत आहे. दरम्यान वाळू माफीयांची दादागीरी वाढतच असून महसूल कर्मचार्‍यांमध्ये भिती आहे. प्रशासनाने वाळू माफीयावर कारवाई करावी, अशी मागणी तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मडामे यांना निवेदनाद्वारे केली आहे

blank