वृक्षलागवड व्यापक लोकचळवळ व्हावी -मुनगंटीवार

0
20

पुणे,दि.09-वनयुक्त शिवाराचे लक्ष डोळ्यासमोर ठेवुन वनाधिकारी यांनी १ जुलै २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवड करण्याची तयारी करावी. वृक्षलागवड ही व्यापक लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूणे येथे वरीष्ठ वनाधिकारी यांच्या चौथ्या राज्यस्तरीय परीषदेच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी व्यक्त केली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते वन विभागाच्या ई लायब्ररीचे लोकार्पण करण्यात आले. या ई लायब्ररीमध्ये वन विभागाच्या विविध पुस्तकांचे, अहवालांचे व प्रकाशनांचे डीजीटल स्वरुपात जतन करण्यात आलेली आहेत. राज्य, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके आहेत. त्यात वन, वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण व निसर्ग संवर्धन यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत परंतु ती प्रत्येकाला विकत घेऊन वाचणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा पुस्तकांचे डीजीटायशेनची संकल्पना पुढ़े आली.
ही परीषद ८ व ९ जुलै अशी दोन दिवस यशदा पुणे येथे पार पडणार असुन या परीषदेस वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मु्ख्य वन संरक्षक सर्जन भगत यांचे सह सर्व वरीष्ठ वनाधीकारी उपस्थित राहणार आहेत.
या वेळी बोलतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या १ जुलैला झालेल्या 2 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या यशाचा उल्लेख करताना वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. २ कोटी वृक्ष लागवड ही एक सुरुवात असुन १ जुलै २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवड करणे यावर आता लक्ष केंद्रीत करुन त्याच्या अंमलबजावणीसाठी अचुक नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. १ जुलै च्या मोहिमेचे सर्व राज्यात कौतुक करण्यात आले आहे. याच पद्धतीने काम करुन दरवर्षी वन विभागाचे अभिनंदन करण्याची संधी वन विभागास मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व वनाधिकारी यांनी त्या दृष्टीने कामाला लागले पाहीजे. आपल्या मोहिमेने प्रेरीत इतर विभाग, संस्था, जनता यांनी प्रेरीत होऊन विधायक कामात सहभागी व्हावे अशी आपली कार्यशैली असावी. आपल्या मोहीमेचे योग्य अभिलेखे आपण तयार केल्यास संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण निधी आपण प्राप्त करु शकतो. यासाठी छायाचित्रे, चलचित्रे, माहीती तंत्रज्ञान या माध्यमांचा उपयोग केला पाहीजे. या संदर्भात नाना साहेब धर्माधीकारी प्रतिष्ठान यांनी अत्यंत व्यवस्थीत अभिलेखे तयार करुन जतन केलेले आहेत.
या मोहीमेद्वारे आपल्याला वनयुक्त शिवार तयार करावयाचे असुन त्याद्वारे आपल्याला लाभदायक जन चळवळ उभारता येऊ शकते. आता वन विभागाने ५० कोटी रोपे तयार करण्यासाठी रोप वाटीका निर्माण करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक रोपवाटिका तयार करणे, रेल्वे, महामार्ग, संरक्षण या विभागासोबत झालेल्या सांमजस्य कराराची अंमलबजावणी करणे यावर लक्ष केंद्रीत करावे. याद्वारे वृक्ष लागवडीसोबतच महसुल देखील जमा होऊ शकतो. वन विभागाच्या अशा प्रकारच्या क्रीयात्मक सहभागामुळे एक वेळ अशी यायला हवी की वन विभागाकडून वित्त विभागाकडे पैसा येऊ लागेल. याशिवाय पुढील ४ महिन्यात आपल्याला ग्रीन आर्मी स्थापन करावयाची आहे. जनतेच्या विश्वास संपादन करणे व टीकवुन ठेवणे यासाठी प्रभावी अशी तक्रार निवारण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. या यंत्रणेचा एक भाग म्हणून कॉल सेंटर्स स्थापन करावीत. तसेच वन विभागाची सर्व कार्यालये ही ISO व्हावीत अशीही अपेक्षा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.