अजित पवार यांनी वेगळ्यापद्धतीने घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

0
364

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याचा विक्रम केला. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पिंक जॅकेट घातला होता. तसेच मी शपथ घेतो ऐवजी त्यांनी ‘गांभीपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शब्दाचा वापर करत वेगळपणा सिद्ध केला.
अजित पवार यांनी केली प्रतिज्ञा


अजित पवार यांनी शपथविधीला सुरुवात करताना म्हटले, ‘मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शपथविधी समारंभाला त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार दरम्यान वापरलेला गुलाबी जॅकट परिधान केला होता. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले 22 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते. उद्योगपती आणि बॉलीवूड स्टार सोहळ्यासाठी आले होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथ घेतली.