विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात,16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात

0
222

देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजपासून 9 डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे सर्व नवनिर्वाचित आमादारांना शपथ देणार आहेत. तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं सांगितलं आहे.


आजपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. 9 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यश्रांची निवड केली जाणार आहे. तोवर हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे कामकाज पाहणार आहेत. कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. तसंच विधानपरिषदेच्या सभापतींची देखील निवड केली जाणार आहे.
यंदाच्या 15 व्या विधानसभेत 288 पैकी 78 सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यात भाजपचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 14, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8 आमदार पहिल्यांदाच विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीकडून 4 नेते हे पहिल्यांदाच विधिमंडळात निवडून आलेले आहेत.

हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार?
विधिमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशव पार पडल्यानंतर हिवाळी अधिवेशन होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 12 डिसेंबरपासून नागपुरात विधानमंडळ सचिवालयाचं काम सुरु होणार आहे. नागपुरात विधानसभा आणि विधान परिषदेचं सभागृह सुसज्ज करण्याचं काम सुरु झालं आहे.