24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला ठार

0
576

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत कुरखेडा गावाजवळच्या शेतात काम करीत असलेल्या एका महिलेला आज दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास वाघाने ठार केले. शारदा महेश मानकर (२६) रा. कुरखेडा, ता. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. शारदाला एक ३ वर्षांचा मुलगा असून, ती ८ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती आहे.

मानकर यांचे शेत कुरखेडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असून, ते खंड क्रमांक ४११ मधील जंगलाला लागून आहे. मानकर यांच्या शेतातील धानाचे चुरणे नुकतेच आटोपले. त्यामुळे खळ्यावर राहिलेले धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर ही शेतावर गेली होती. धान पाखळत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच गतप्राण झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारच्या शेतातील महिला धावून आल्या. मात्र, तोपर्यंत वाघाने पोबारा केला.