कुरेश कॉन्फरन्स व सामाजीक कार्यकर्त्यांकडून निवेदन
आटपाडी दि . १७ (प्रतिनिधी )-परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा . पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशीच्या मारेकऱ्यां पोलीसांवर गुन्हे दाखल करा . अशा मागणीचे निवेदन आज आटपाडीच्या तहसीलदारांना देण्यात आले .
कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक, कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंजिनीयर असिफ कलाल, कॉन्फरन्सचेच पश्चिम महाराष्ट्राचे सेकेटरी असिफ उर्फ बाबू खाटीक, प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते प्रशांतराव मोटे, अनिसभाई खाटीक यांच्या नेतृत्वाली हे निवेदन आटपाडीचे तहसीलदार, पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना देण्यात आले .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुर्णाकृती पुतळ्यासमोरील परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना निंदणीय आणि निषेधार्य आहे . भारतीय संविधानाचा अपमान, विटंबना आहे . समाज व देशामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या, संबधीत गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा . संवैधानिक मोर्चा काढणाऱ्या आंबेडकरी अनुयायावरती लाठीचार्ज करणाऱ्या, निरपराध तरुणांना बेदम मारहान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करा आणि पोलीसांच्या मारहाणीत पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशीच्या मारेकऱ्यां पोलीसांवर गुन्हे दाखल करा आणि मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परिवाराला शासनाने तातडीने २५ रुपयाची लाखाची मदत करावी, अशी भावना व्यक्त करणारे निवेदन आटपाडीतील स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले . निवेदनाच्या प्रती अन्य मान्यवरांना पाठविण्यात आल्या .
तहसीलदार यांना निवेदन देताना सर्वश्री सोमनाथ ढोबळे, गोविंद जावीर, सोमनाथ जाधव, उत्तम पांढरे, सुरेशचंद्र भिसे, आण्णासाहेब सरगर, दादासाहेब सरगर, शरद वाघमारे, लक्ष्मण पवार हे भीमसैनिक बहुजन सामाजीक कार्यकर्ते उपस्थित होते .