भंडारा जिल्हयात दि.१८ ते २५ डिसेंबर दरम्यान तांदुळ व धान्य महोत्सवाचे आयोजन

0
47

भंडारा,दि.17 : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे सहकार्याने भंडारा जिल्हयातील शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या पुढाकाराने दि.१८ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान तालुका कृषि अधिकारी कार्यालय परीसर, जिल्हा परीषद समोर, सिव्हिल लाईन भंडारा येथे भव्य तांदुळ व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

          सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दि.१८ डिसेंबर रोजी मा.डॉ. संजय कोलते (भाप्रसे), जिल्हाधिकारी भंडारा यांचे हस्ते होणार आहे. सदर महोत्सवात तांदुळ, कडधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, दुध व दुग्धजन्य पदार्थ कृषि आधारीत प्रक्रियायुक्त पदार्थ (पापड, लोणचे), सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळे व भाजीपाला त्याचप्रमाणे कलात्मक वस्तु, खाद्य पदार्थ व बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तुंचे स्टॉल असतील.

           शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने भंडारा शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी तांदुळ व धान्य महोत्सवात भेट देवुन खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा भंडारा श्रीमती उर्मिला चिखले तसेच महोत्सवाचे आयोजक अजित कुमार गजभिये यांनी केले आहे.