33.8 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home Top News TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

0
10

मुंबई : टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणावरून राज्याच्या विधानसभेत आज जोरदार राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षांनी (Opposition Party) या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या प्रकरणावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल विधानसभेत सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.विरोधकांनी दावा केला की, राज्यात पेपरफुटीचे प्रमाण वाढत असून महाराष्ट्र (Maharashtra) या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच NEET पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणातही महाराष्ट्रातून आरोपी अटक झाल्याचा उल्लेख करण्यात आला.विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींचे नाव घेत गंभीर आरोप केल्याने वातावरण आणखी तापले. भिवंडी परिसरातून टीईटी पेपर फुटीची माहिती बाहेर आली असून काही आरोपी पकडल्याचेही त्यांनी सांगितले.