बँक खात्यात 2 लाख डिपॉझिट करणारे इन्कम टॅक्सच्या रडारवर

0
5

मुंबई, दि. 17 – आठ नोव्हेंबरनंतर ज्यांच्या खात्यामध्ये 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. सध्या बँक लॉकर, बडया आसामींविरोधात छापेमारीची कारवाई सुरु आहे. पुढच्या टप्प्यात 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा हिशोब न देऊ शकणा-या खातेधारकांवर कारवाई होऊ शकते.आरबीआयने बँकांकडून संशयास्पद व्यवहार झालेल्या खात्यांची माहिती मागवली आहे. ही माहिती आयकर खात्याला दिली जाऊ शकते.