रद्द झाले तितकेच चलन न छापण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत

0
11

नवी दिल्ली, दि. 17 – नोटाबंदीच्या निर्णयानंतर 15.44 लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. रद्द झालेले हे सर्व चलन पुन्हा तितक्याच नव्या नोटा छापून बाजारात आणणार नसल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. रद्द झालेल्या नोटा आणि नवीन नोटा छापल्यानंतर जी पोकळी राहील ती डिजिटल व्यवहारातून भरुन काढली जाईल.फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अरुण जेटली यांनी हे संकेत दिले.