24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home महाराष्ट्र गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणातील संशयित डॉ. शिंदेचा तुरुंगात मृत्यू

गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणातील संशयित डॉ. शिंदेचा तुरुंगात मृत्यू

0
28

नाशिक दि.०3 मार्च – बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील तुरुंगात असलेला संशयित आरोपी डॉ. बळिराम निंबा शिंदेचा आज (शुक्रवार) तुरुंगात मृत्यू झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील शिंदे हॉस्पिटल येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची बाब महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना लक्षात आल्याने डॉ. बळिराम निंबा शिंदे याला अलिकडेच ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी शिंदेचा तुरुंगात मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजले नसून तपास सुरू आहे.