थकीत वीज बिलासाठी प्रोत्साहन योजना – बावनकुळे

0
8

मुंबई दि. 18 – राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून होत आहे; मात्र पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी थकीत रक्कम हप्त्याने भरण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत तसेच विधान परिषदेतही निवेदनाद्वारे दिली.
राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्यांने भरून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रोत्साहन योजना आणली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका निवेदनातून दिली.