आग्रा 2 बॉम्बस्फोटांनी हादरले

0
13

आग्रा दि.१८-शहरात शनिवारी सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या स्फोटांमुळे दहशत निर्माण झाली. एक स्फोट आग्रा कँट रेल्वे स्टेशनजवळील एका कचऱ्याच्या डब्यात झाला, तर दुसरा स्फोट एका प्लंबरच्या घरात झाला. सध्या कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटांची माहिती मिळताच फौजफाट्यासह पोलिस उपमहानिरीक्षक घटनास्थळी पोहोचले.
प्लंबरच्या घरात हे बॉम्ब बनवण्यात आले असावेत अशी शंका आहे. आसपासचा परिसर मोकळा करण्यात आला आहे.
– न्यायवैद्यक तज्ज्ञ पाहणीसाठी पोहोचले आहे.
– हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र खरी माहिती तपासानंतरच समोर येणार आहे.
– या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
– या प्रकरणी चौकशी सुरू असून कोणतीही हानी झाली नसल्याचे पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले.
– शुक्रवारी रात्रीच मालपुराजवळ रेल्वे उलटवण्याचा कट समोर आला होता. तसेच आयएसआयच्या नावाने धमकीचे पत्रही मिळाले होते.
– तर गुरुवारी ताजमहालावर आत्मघातकी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.
– सध्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.