नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित

0
8

मुंबई,दि.22: डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधात आता कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. तर सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत रजेवर गेलेल्या डॉक्टरांना नोंदणी रद्द करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तर पुण्यातील 200 डॉक्टरांना नोटीस धाडण्यात आली आहे.बेकायदेशीररित्या सामूहिक रजेत सहभागी झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.तिकडे पुण्याच्या ससून रुग्णालयात अजूनही 200 डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत.डॉक्टरांच्या मारहाणीच्या निषेधार्थ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 114 डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता राजाराम पोवार यांनी या डॉक्टरांचं निलंबन केले.इकडे मुंबईत सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना आरोग्य विभागाच्या संचालकांनी नोटीस बजावली. कामावर रुजू न झाल्य़ास डॉक्टरांची नोंदणी रद्द कऱण्यात येणार आहे.दरम्यान, हायकोर्टाने काल खडसावूनही अद्याप डॉक्टरांचं कामबंद आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे रुग्णांचं मोठं हाल होतं आहे.