देशभरातील शंभर महापौरांचे नागपुरात शिखर संमेलन

0
10

नागपूर दि.२३: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत नागपुरात ७ आणि ८ एप्रिल रोजी हॉटेल ली-मेरिडीयन येथे दोन दिवसीय शिखर संमेलन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात देशभरातून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी निवड झालेल्या १00 शहरातील महापौर, आयुक्तांसह पदाधिकारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. संमेलनात स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रमांबाबत देशातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. याशिवाय विदेशातील स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणारे तज्ज्ञसुद्धा अत्याधुनिक प्रकल्पाबाबत माहिती देतील. सदर संमेलनात उद््घाटनानंतर स्मार्ट गव्हर्नस, स्मार्ट मोबिलिटी, स्मार्ट इन्व्हायर्नमेंट, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर अशा चार भागांत विभागले जाईल. एकाच वेळी चार विविध सभागृहात संबंधित वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. दोन दिवसांतील या भरगच्च कार्यक्रमासोबतच प्रदर्शन आणि फिल्ड व्हिजिटचेही आयोजन करण्यात आले आहे.