नांदेडमधील कर्तृत्ववानांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

0
16
नरेश तुप्तेवार
नांदेड,दि.02 :-1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले व  पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झालेल्या या समारंभात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या  व्यक्ती आणि घटकांना ना. खोतकर यांच्या हस्ते पुरस्कार, पारितोषीके प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले असून त्यामध्ये जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, क्रीडाक्षेत्र, ग्रामविकास क्षेत्रातील विविध ग्रामपंचायती, तसेच युवा पुरस्कारांचा समावेश होता.
या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार     जवळगावकर, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर सौ. शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींचा समावेश  होता.
    विविध पुरस्कार आणि पारितोषिकांचे मानकरी,घटक,पुरस्कार व बक्षिसे पुढील प्रमाणे –  आदर्श तलाठी पुरस्कार – बी. डी. कुराडे- पिंपळगाव महादेव, ता. अर्थापूर. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र – अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, पोलीस उपअधीक्षक विश्र्वेशर नांदेडकर, पोलीस निरीक्षक माणिक बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट भारती, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तरोडेकर, विठ्ठल जाधव, चालक पोलीस हवालदार रमाकांत शिंदे, पोलीस हवालदार गोविंद जाधव, पोलीस नाईक देविकांत देशमुख, दत्तराव जाधव, सुभाष आलोने. यावेळी जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम अंतर्गत स्मार्ट ग्रामपंचायतींना पुरस्कारांचेचे वितरण झाले. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदींनी हे पुरस्कार स्विकारले.  त्यामध्ये समावेश असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे- ग्रामपंचायत झरी (ता. लोहा), ग्रामपंचायत चिंचोली (ता. कंधार), ग्रामपंचायत हिब्बट (मुखेड), नागराळा (देगलूर), शेळगाव गौरी (नायगाव), खतगाव (बिलोली), बामणी थडी (धर्माबाद), गोरठा (उमरी), नागेली (मुदखेड), लहान (अर्धापूर), कोटतीर्थ (नांदेड), टेंभुर्णी (हिमायतनगर), निचपूर (किनवट), लांजी (माहूर), आष्टी (हदगाव).उत्कृष्ट खेळाडू- पारस गंगालाल यादव (जलतरण), रम्शा कलिमोद्यीन फारुखी (बॅडमींटन), कलिमोद्यीन फारुखी (बॅडमींटन). गुणवंत क्रीडा संघटक- प्रा. डॉ. बळीराम लाड. राज्य पोलीस शुटींग स्पर्धेतील दोन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदक विजेते पोलीस कॉ. शंकर भारती. जिल्हा  युवा पुरस्कार- शिवशंकर मुळे, जिल्हा युवा पुरस्कार संस्था- कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा कुंचेली ता. नायगाव.या सर्व पुरस्कार व पारितोषीक विजेत्यांना पालकमंत्री खोतकर यांनी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह तसेच रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले