25 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ आमगावात कुणबी समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

आमगावात कुणबी समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

0
57

आमगाव,दि.०२- येथील कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा १ मे रोजी सामुहिक विवाहसोहळ्याचे आयोजन बनगाव परिसरातील समाजभवन परिसरात माजी अर्र्थमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते.या सामुहिक विवाह सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे,आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम माजी आमदार केशवराव मानकर,माजी आमदार भेरसिंह नागपुरे,दिलीप बन्सोड,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर,आमगाव पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये,देवरी कृर्षी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती रमेश ताराम,सविता पुराम,अ‍ॅड.येशुलाल उपराडे,सुखराम फुंडे यांच्यासह जि.प.सदस्य,प.स.सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.