उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचा सत्कार

0
13

नांदेड,दि.8-नांदेड परिक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ११ पोलीस अधिकार्‍यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गुन्हे बैठकीदरम्यान सत्कार करण्यात आला.

नांदेड परिक्षेत्रात उत्कृष्ट तपास, उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत असणे, उत्कृष्ट पैरवी आदी विषयांत चांगली कामगिरी करणार्‍या ११ पोलीस अधिकार्‍यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, गंगाखेड पोलीस ठाण्याचे फौजदार राहुल बहुरे, लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक डी.जी.गायकवाड, हिंगोली सायबर सेलचे फौजदार विनायक लांबे यांचा उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत असल्याबद्दल, नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस निरीक्षक आनंद धोटे, परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक एन.ए.चिंचोळकर, लातूर स्थागुशाचे पोलीस निरीक्षक बी.आर.सोनटक्के,वसमत पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक जोंधळे यांचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच नांदेड ग्रामीणचे फौजदार एम.जे.झडते, परभणीचे फौजदार नासेर खालेद चाऊस, हिंगोलीचे फौजदार विश्‍वनाथ बोईनवाड यांचा उत्कृष्ट पैरवी केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, लातूरचे पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड,अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुंजाळ उपस्थित होते.