स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना

0
12

औरंगाबाद, दि. 11 –  मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊन ५७ वर्षाचा कालावधी लोटला पण अजूनही मराठवाडा विकासात हजारो मैल दूरच आहे. येथील अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होत असून तो कधी दिवस सहन करायचा. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना  करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली.

स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी रविवारच्या मुहूर्तावर एका बैठकीत बीजरोपण करण्यात आले. यावेळी चंद्रभान पारखे, द्वारकाभाऊ पार्थीकर, प्रा.बाबा उगले, प्रा.एस.ए.सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ओमप्रकाश वर्मा,सुनिल ठाकरे,डी.एस.बनकर,जी.एस.गायकवाड, प्रा.प्रशांत अवचरमल, एन.टी.जोशी,रमेश चव्हाण,रंगनाथ शेजवळ, प्रा.भागवत जमादार,चंद्रकांत भराड आदींची उपस्थिती होती.