शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यासाठी शिवसेने चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
10

चिमूर,दि.11- मागील 60 वर्ष काॅंग्रेसची एकहाती सत्ता असताना बळीराजाला पाहिजे ती मदत न केल्याने व हमीभाव न दिल्यानेच आज भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याचे सागंत शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिंग वर्मा यांनी नायब तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन सादर केले.निवेदनात शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यात यावे, दुधाचे भाव ५० रुपये लिटर करावे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे ,शेतकऱ्यांना  वयाचे ६० वर्षा पासून निवृत्ती वेतन द्यावे ,स्वामिनाथन आयोग् लागू करावा, मोफत बी बियाणे ,शेती उपयोगी अवजारे उपलब्ध करावे, शेतमाला हमीभाव द्यावे अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनोज तिजरे, अण्णा गिरी, केवल सिंग जुनी, खेमराज थुटे, प्रदीप बघेल ,सुधाकर बघेल ,विजय गोठे, भास्कर मांडवकर, प्रवीण ठवरे, गणेश गभने, दिनेश घुगस्कर ,संदीप उरकूडे, खुशाल डाहूले, ईशवर ठा करे, सुरेश पाखरे, तुकडू ठाकरे, केशव ननावरे, सदाशिव नागोसे, विलास देहारे, राहुल मसराम आदी उपस्थित होते.