शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळा सावंत यांचे निधन

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत (वय 64) यांचे गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दिर्घ आजाराने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात निधन झाले. बाळा सावंत हे मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

बाळा सावंत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. उद्धव यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. सावंत मुंबई महापालिकेत 1997 पासून सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2009 साली त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली व जिंकलीही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपचे कृष्णा पारकर यांचा पराभव करीत दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

बाळा सावंत मागील काही दिवसापासून आजारी होते. त्यामुळे त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असतानाच गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील बहुतेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.