सत्ताधार्‍यांनी दिला शेतकर्‍यांना दगा

0
13

गोंदिया : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. मात्र भाजप सरकारने धानाची आधारभूत किंमत कमी करून शेतकर्‍यांना दगा दिल्याचे उद्गार आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काढले. कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येथील शहीद भोला कॉंग्रेस भवन येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते.
सभेला कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार रामरतन राऊत, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, गोरेगाव तालुकाध्यक्ष डोमेंद्र रहांगडाले, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष मिताराम देशमुख, तिरोडा तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे, देवरी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडिया, आमगाव तालुकाध्यक्ष राजकुमार फुंडे, सालेकसा तालुकाध्यक्ष अनिल फुंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार राऊत यांनी, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पराजयाची निराशा सोडून पराजयाच्या कारणांवर चिंतन करून त्यात सुधारणा करीत पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे मत व्यक्त केले