राज्य शासनाच्या २०१४ साठीच्या कृषी पुरस्कारांची घोषणा

0
18

मुंबई, दि. 29 : कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची घोषणा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केली. हे पुरस्कार 2014 या वर्षासाठीचे असून कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. राज्यपालांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार :

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील कृषी क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस दिला जाणारा डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार विश्वासराव आनंदराव पाटील यांना घोषीत झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार असून रु.75000/- रोख ,स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार :

कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय आणि सहकार व ग्रामीण विकास या क्षेत्रात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती/संस्थेस वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार देण्यात येतो. रु.50000/- रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .

आज घोषित करण्यात आलेल्या  विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

  1. दिलीप नारकर
  2. प्रेमानंद महाजन
  3. आनंदराव गाडेकर
  4. मच्छिंद्र कुंभार
  5. माधवराव पाटील
  6. आनंदराव मटकर
  7. शेषराव निखाडे
  8. दत्तात्रय गुंडावार

 

3) जिजामाता कृषीभुषण पुरस्कार :-

शेती क्षेत्रातील महिलांचा वाढत्या सहभागाचा गौरव करण्याच्या तसेच इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना जिजामाता कृषी भुषण पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये 50,000/-रोख, स्मृतीचिन्ह आणि  सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान  करण्यात येतो.

आज घोषित करण्यात आलेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

  1. माधुरी भोईर
  2. सुनिता रावताळे
  3. वैशाली पवार
  4.     विद्या रुद्राक्ष
  5. लक्ष्मीबाई पारवेकर

4) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार :-

आपल्या  कृषी विषयक ज्ञानाचा फायदा परिसरातील इतर शेतक-यांना व्हावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे शेतकरी किंवा पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषी क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती /संस्था यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र हाबहुमान प्रदान करण्यात येतो. पुरस्कारार्थींना रुपये 30,000/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देवून पुरस्कारार्थीना गौरविण्यात येते.

आज घोषित करण्यात आलेल्या  विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

  1. राजेश चोबे
  2. व्यंकट कुलकर्णी
  3. चैताली नानोटे

 

5) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार :-

शेतीमध्ये सुधारीत शेती औजारांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर यांसारख्या अनेक निकषांच्या आधारे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. सर्वसाधारण गटात 19 जणांना तर आदिवासी गटात 6 जणांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारार्थींना रुपये 11,000/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्रदेऊन त्यांचा गौरव केला जातो.

आज घोषित करण्यात आलेल्या  विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

 

सर्वसाधारण गट

  1. राजेंद्र पाटील
  2. देवेंद्र राऊत
  3. चिंधा पाटील
  4. हिम्मतराव माळी
  5. अंजली घुले
  6. बाळासाहेब काकडे
  7. रमेश जाधव
  8. दत्तात्रय पाटील
  9. आनंदा  पाटील
  10.  दत्तात्रय चव्हाण
  11.  शिवाजी बनकर
  12.  व्यंकटी गीते
  13.  शिवाजी कन्हेरे
  14.  धनंजय घोटाळे
  15.  रवींद्र मेटकर
  16.  सचिन सारडा
  17.  शालिग्राम चाफले
  18.  रियाज कन्नोजे
  19.  अविनाश कहाते

आदिवासी गट

 

  1. बाळकृष्ण पऱ्हाड
  2. कल्पनाबाई बागुल
  3. दिगंबर घुटे
  4. मारोती डुकरे

५.     झापू जामुणकर

६.     वडू लेकामी

 

6) उद्यान पंडीत पुरस्कार :

फलोत्पादनाच्या  क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणारे शेतकरी / संशोधन संस्था / बागायतदार संस्था इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उद्यान पंडीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 25,000/- रु रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आज घोषित करण्यात आलेल्या  विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

 

  1. प्रकाश ठाकूर
  2. सुभाष गुंजाळ
  3. रवींद्र पाटील
  4. गणपत पारटे
  5. भीमराव शेंडगे
  6. दत्तात्रय फटांगरे
  7. पुष्पा खुबाळकर
  8. हिम्मतराव टप्पे

 

7) कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

राज्यामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सेंद्रिय शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी / संस्था यांना कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देण्यात येतो.  रू.50,000/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आज घोषित करण्यात आलेल्या  विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

 

  1. मधुकर मोहपे
  2. नारायण चौधरी
  3. नीता बांदल
  4. प्रदीप निकम
  5. बाळासाहेब जीवरख
  6. नासरी चव्हाण
  7. सुधाकर कुबडे
  8. दिलीप कुलकर्णी
  9. मानस रुरल डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट

 

 

8) पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार :

राज्यातील कृषी विभागात काम करणाऱ्या आणि राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देवून विजेत्यांचा गौरव केला जातो.

आज घोषित करण्यात आलेल्या  विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

 

  1. विनय आवटे
  2. प्रदीपकुमार अजमेरा
  3. भागीनाथ गायके