गणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका दाखल

0
12

पुणे,दि.11 -लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे.इतिहासाचे चुकीचे लेखन करुन बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले तरी वास्तविकता मात्र वेगळीच असून गणेशोत्सव टिळकांनी नव्हे तर भाऊ रंगारी यांनी सुरु केल्याचा दावा गणेश मंडळाच्या विश्वस्तांनी केला आहे.
गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले.पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे.गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या याचिकेत 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली.1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली.1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली.1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर
लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? असा असा दावा करत भाऊ रंगारी गणेश मंडळांने पुढील मागण्यांसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.
भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या मागण्या
– भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावे
-सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे 126 वे वर्ष आहे 125 वे नाही
गणेशोत्सव आणि टिळक हे समिकरण आहे. मात्र आता नवा वाद निर्माण झाला आणि तो कोर्टातही गेला.इतिहासाच्या पानांमधून याचे उत्तर मिळेलच.परंतु इतिहासाचे विदुप्रीकरण व्हायला नको बस.