नाशिक येथील पत्रकारावरील हल्लाच्या बिलोली पत्रकारांनी नोंदवला निषेध

0
16

नांदेड / बिलोली दि.१९ : नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ पञकार राम  खुर्दल यांच्यावर  झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पञकार संरक्षण समिती बिलोलीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊन काही महिने झाले असुन सुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला तयार नाहीत. याचे प्रत्येय नुकतेच नाशिक जिल्ह्य़ातील गुरनारे या ठिकाणी श्री राम खुर्दल या जेष्ठ पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यातुन दिसुन येते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन समाजातील तळागाळातील जनतेच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत निस्वार्थपणे हक्क मिळवून देण्याचे काम करतो. परंतु समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या विकृत मानसांनी पत्रकारांवर सततचे हल्ले करून मानसिकता दाखवतात. याच मानसिकतेतून जेष्ठ पत्रकार  श्री राम खुर्दल यांच्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शिक्षण सभापती व कार्यकर्ते यांनी मारहाण करून खुर्दल यांचे हात फ्रॅक्चर केले आहे. याला शासनाने पाठीशी का घालते? असा प्रश्न राज्यातील तमाम पत्रकारांना पडला आहे. असे पत्रकारांवर  नेहमी हल्ले होत असतांना कायदे करून त्याची अमलबजावणी करण्यास शासनमात्र अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.परंतु अश्या  हल्ल्यांना आम्ही घाबरणार किंवा लेखणीही  थांबणार नाही. आम्ही आमच्या लेखणीच्या माध्यमातून सत्य लिहिल्याशिवाय मरणार नाही.असा पवित्रा घेत पत्रकार संरक्षण समिति बिलोली च्या वतिने या हल्ल्याचा निषेध करुन बिलोली तहसिलदार यांना निवेदन देऊन सदरील हल्ल्याच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर कारवाई करावी असे शासनाला सुचविले आहे.यावेळी पत्रकार संरक्षण समिति चे अध्यक्ष ए. जी. कुरेशी,उपाध्यक्ष प्रकाश फुगारे, सचिव सय्यद रियाज, पाशाभाई गादीवाले, गिरगावकर गणेश, अनिल मोरे, इलीयास फारुखी, सतिश गिरी, मारोती वाघमारे, बडूरकर, उपस्थित होते.