तंत्रशिक्षण परिक्षा शुल्क कपात करा-राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

0
10

गडचिरोली,दि.19-सन २0१७ या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे तंत्रशिक्षण परीक्षा शुल्कात मोठय़ा प्रमाण वाढत करण्यात आली आहे. सदर परीक्षा शुल्क शिक्षण घेणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाढविलेल्या परीक्षा शुल्कात कपात करून ते पूर्ववत करावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीस महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी प्रमुख व युवा जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षापर्यंत तंत्रशिक्षण परीक्षा शुल्क ३६0 रूपये एवढे होते. मात्र महाराष्ट राज्य तंत्रशिक्षण मंडळाने सन २0१७ या शैक्षणिक सत्रापासून परीक्षा शुल्क ६00 रूपये करण्यात आले आहे. यामुळे मुलांना आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना सहन करावा लागणारा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी वाढलेल्या परीक्षा शुल्कात कपात करून ते पूर्वत करण्यात यावे. पेपरनुसार परीक्षा शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.