जामीनासाठी प्रफुल्ल पटेलांनी लावली जिल्हा न्यायालयात हजेरी

0
14

गोंदिया,दि.०९- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आज ९ फेबुवारीला गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर होत एका प्रकरणात जामीन घेतला.१ जून रोजी गोंदिया येथील जयस्तंभ चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी जिल्ह्यात प्रतिबंधक कलम असताना आंदोलन करण्यात आले होते.त्याप्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी खासदार प्रफुल पटेलासंह २०० जणावंर गुन्हा नोंदविण्यात आला होता. पटेल यांनी आज, ९ फेब्रुवारीला आश्चर्य चकीत धक्का देत कुठलाही न्यायालयीय आदेश नसताना रास्तारोको प्रकरणात आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा जामीन घेण्यासाठी जिल्हासत्र न्यायालयात हजेरी लावली.
सविस्तर असे की, १ जून २०१७ ला राष्टवादी काँग्रेस पक्ष गोंदिया जिल्ह्यातर्फे शेतकरी व बेरोजगार युवकांच्या समस्यांना न्याय द्यावा. करिता खासदार प्रफुल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात राष्टवादी काँग्रेस पक्षातर्फे उपविभागीय कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गोंदियातील मुख्य जयस्तंभ चौक येथे खा. प्रफुल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन, नगरसेवक अशोक गुप्ता, विजय रगडे, नानू मुदलीयार व अशोक शहारे यांच्यासह २०० शेतकरी व बेरोजगारांनी रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जमावबंदी कलम लागू करण्यात आलेली होती. त्या जमावबंदी कलमाला न जुमानता खा. पटेल व त्यांच्या सहकार्यांनी विनापरवानगी रास्तारोको केल्याने गोंदिया शहर पोलिसांनी त्यांच्यासह २०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणात न्यायालयात आपल्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पटेलांना कळताच त्यांनी आज, स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंती कार्याक्रमानंतर आलेल्या सर्व मान्यवरांना बिर्सी विमानतळावर सोडून ते सरळ सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जिल्हासत्र न्यायालयातील न्यायमूर्ती ए.बी. तहसीलदार यांच्या कोर्टात हजर झाले. न्यायमूर्ती यांनी त्यांना सदर गुन्हा कबूल आहे का? अशी विचारणा केली असता त्यांनी नकार दिला. दरम्यान याप्रकरणी त्यांचा जामिन शैलेश डायाभाई पटेल यांनी घेतला. पटेलांच्या बाजूने अ‍ॅड. विनोद जानी, निजाम शेख व अभिजित शहारे यांनी बाजू मांडली. याप्रकरणी त्यांना पुढील सुनावनीकरिता २२ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे.