स्व.मनोहरभाई जयंती समारोहात सुवर्णपदकाने विद्यार्थ्यांचा सत्कार

0
10

शिक्षणासह सिंचनाला महत्व-प्रपुâल्ल पटेल

गोंदिया,दि.09 : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिक्षण आणि इतर क्षेत्रात स्व. मनोहरभाई पटेल यांनी कार्य केले. त्यांचे कार्य पुढे मी देखील रेटत गेलो. मनोहरभाई पटेल यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. संस्था चालवीत असताना कसल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता केवळ शिक्षणक्रांती करण्याच्या उद्देशाने कार्य सुरू ठेवले. त्यामुळे आजघडीला गोंदिया शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण ग्रहण करत आहेत. त्यासह सात हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. शिक्षण आणि शेती या दोन विषयाला राजकारण सोडून हात घातला. त्याचीच फलश्रुती म्हणून दोन्ही जिल्ह्यांत सिंचनाची सोय उपलब्ध झाली. आम्ही नेहमीच शिक्षणासह सिंचनाला महत्व दिले असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य प्रपुâल्ल पटेल यांनी केले. ते  शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त डी.बी.सायन्य कॉलेजच्या प्रांगणात आयोजित सुर्वणपदक वितरण सोहळ्यात आज शुक्रवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, आ. अबु आझमी, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, उत्कर्ष पारेख, माजी मंत्री अनिल देशमुख, उमादेवी अग्रवाल,आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्दिप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी आ.अबु आझमी म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांनी आपले वडील मनोहरभार्इंने लावलेल्या ए़का छोट्याशा रोपट्याने वटवृक्षात रूपांतर करून दाखविले. गोंदियात  आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आणि हवाई प्रशिक्षण केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. तेव्हा येथे सिंचनाची व्यवस्था व्हावी. याकरीता पटेलांना मी नेहमीच धडपड करताना पाहिले आहे. तेव्हा प्रत्येकांनी आपल्यासाठी न जगता दुसर्यांसाठी जगावे. आज देशात जातीधर्माच्या नावावर जे काही सुरू आहे. त्याला थांबविण्यासाठी सर्व जातीधर्मातील नागरिकांनी ऐकत्र कार्य करायला पाहिजे. असे सांगून त्यांनी दोन शायरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण घेवून उर्तीण झालेल्या गुजराती नॅशनल हायस्कूल गोंदियाची सिया धमेंद्र ठाकूर, ओंकार केशव चोपकर,  रिचा अनिल बिसेन, वैष्णवी अशोक शेंडे, दिशा संतोष अग्रवाल, दीपा गणेश पंजवानी, तोशाली भोयर, नूपुर चंद्रकांंत खंडेलवाल, पूनम प्रमोद रोहणकर, ओजल धमेंद्र उरकुडकर, मोनिका नरेंद्र नखाते, हर्षा गोपाल बलवानी, नूतन मनगटे, अश्विनी दीनदयाल रोकडे यांचा यांचा सुवर्णपदाकाने सत्कार करण्यात आले. सोबतच कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाड्ढया व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आभार नरेश माहेश्वरी यांनी मानले.  यावेळी दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.