कृषी विभाग पिछाडीवर; राज्याचा विकासदर घटला

0
5

मुंबई,दि.08 : महाराष्ट्र राज्याचा सन 2017 – 18 सालचा आर्थिक पाहणी अहवाल आज (गुरुवार) विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याचा कृषी विभागाचे उत्पन्न घटले असून परिणामी राज्याच्या स्थूल उत्पन्नात घट झालेली आहे. सन 2016-17 साली राज्याचे उत्पन्न विकास दर पहिल्यांदाच दोन आकड्यात जात 10 टक्के झाले होते. यंदा त्यात घट होवून ते 7.3 टक्के झाले आहे.महाराष्ट्र राज्याचा 2017-18 सालचा आर्थिक पाहणी अहवालनुसार राज्याचे स्थूल राज्य उत्पन्न घटले आहे. पुर्वानुमानानुसार 2017-18 चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 19 लाख 59 हजार 920 कोटी रुपये अपेक्षित आहे. तर पुर्वानुमानानुसार सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 24 लाख 96 हजार 505 कोटी अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याचा विकास दर हा 2015 – 16 साली 7.6 टक्के होता. त्यात वाढ होत 2016 -17 साली विकास दर 10 टक्के झाला होता. राज्याने पहिल्यांदाच दोन आकडी विकास दर गाठला होता. त्यात यंदा घट होत विकासदर 7.3 टक्क्यांवर आला आहे.