पालिका उपायुक्तांसह एक अटकेत

0
12

औरंगाबाद – औरंगाबाद महानगर पालिकेचे उपायुक्त आशिष पवार आणि प्रकल्प संचालक प्रमोद खोब्रागडे यांना शासनाचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
मराठी वृत्तवाहिनीवरील वृत्तानुसार, महानगर पालिकेतंर्गत राबवल्या जाणार्‍या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. खोटी बीले सादर करुन शासनाचे एक कोटी 70 लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न उपायुक्त पवार आणि खोब्रागडे यांनी केल्याचा आरोप आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 1145 युवकांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवण्यात आले आणि त्यापोटी कोट्यवधी रुपेय लाटण्यात आल्याचा आरोप आहे.कोट्यवधीच्या या घोटाळ्यात अनेक बडे अधिकारी अडकले असण्याची शक्यता आहे.