मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

0
10

मुंबई – सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेनेच महसूल मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला असून सावनेरच्या तहसीलदाराच्या निलंबनावरून सेनेच्या गुलाबराव पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

सावनेरच्या तहसीलदाराच्या निलंबनाची घोषणा झाल्यानंतरही या अधिकाऱ्याचे महसूल विभागाने निलंबन केले नाही, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. त्यावरून खडसे यांच्या विरोधात शिवसेनेने हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

गुजरातला दमनगंगा अणि नारपार योजनेतून पाणी देण्यासंदर्भात सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावरून आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंगाची प्रस्ताव मांडला.