मुंबई,दि.20 : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषद व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. निकाल ८ तारखेला जाहीर करण्यात येतील.जिल्हा परिषद सदस्यांच्या आरक्षणासंदर्भात घोळ झाल्याने या पाच जिल्हा परिषदांमधील निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने अखेर त्या ठिकाणचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
सध्या या पाचही जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक नेमण्यात आले आहेत. निवडणूक होत असलेल्या पाचपैकी तीन विदर्भातील तर दोन उत्तर महाराष्ट्रातील आहेत. या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ती ८ जानेवारीपर्यंत कायम राहील. निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी ही माहिती दिली.
कोणत्या जिल्हा परिषदेत किती सदस्य
नागपूर ५८,अकोला ५३,वाशीम ५२,धुळे ५६,नंदुरबार ५६
निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज सादर करणे -१८ ते २३ डिसेंबर २०१९
उमेदवारी अर्जांची छाननी -२४ डिसेंबर
अपील नसल्यास उमेदवारी अर्ज मागे घेणे – ३० डिसेंबर
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे – १ जानेवारी २०२०
मतदान – ७ जानेवारी
मतमोजणी – ८ जानेवारी





