28.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home महाराष्ट्र 8 जानेवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

8 जानेवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

0
20

संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनार्थ  

मुंबईदि. 7 : संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनाबाबतच्या ठरावास संमती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. दि. 8 जानेवारी रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन होणार आहे.

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषण होणार असून दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनाबाबत ठराव, असे कामकाज होणार आहे. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसमंत्री सर्वश्री एकनाथ शिंदेजयंत पाटीलदिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरातअनिल परब, आमदार सर्वश्री आशिष शेलारअमिन पटेलसुधीर मुनगंटीवारसुनील प्रभू आदी उपस्थित होते.तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमंत्री सर्वश्री एकनाथ शिंदेसुभाष देसाईअनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री हेमंत टकलेशरद रणपिसेसुजितसिंह ठाकूरजयंत पाटीलरामहरी रुपनवर, सतीश चव्हाण,  आदी उपस्थित होते.