गोकुळचे संचालक सुरेश पाटील यांचा अपघातात मृत्यू

0
19

कोल्हापूर दि. ९– कोल्हापूरमध्ये स्कॉर्पिओ गाडीला शनिवारी झालेल्या अपघातात गोकुळ दूध संस्थेचे संचालक सुरेश पाटील यांचा मृत्यू झाला.
यात्रेसाठी गडहिंग्जला गेलेल्या पाटील कुटुंबियांच्या गाडीला महे गावाजवळ अपघात झाला. भोगावती तुळशी नदीच्या पूलाच्या कठड्याला त्यांची गाडी धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये पाटील यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी, सून, आणि नात जखमी झाले.
गेल्या १५ वर्षांपासून पाटील गोकुळच्या संचालकपदी होते.