गोंदिया,दि.17ः–ओबीसी समाजाच्या विकासात सुरवातीपासूनच अडसर राहिलेल्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यानंतरही ओबीसी समाजाचा छळ सोडलेला नसुन महाराष्ट्रातील इमाव,विजा,भज विभागात विशेष मागास प्रवर्ग कल्याण(मराठा)चा समावेश केल्यानंतर त्या विभागाचे नाव ओबीसी मंत्रालय ठेवण्याएैवजी बहुजन कल्याण विभाग करण्याचा शासन निर्णय आज १७ फेबुवारीला काढला.सोबतच या बहुजन कल्याण विभागात खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टया दुर्बल घटक(सवर्ण)चा समावेश करुन ओबीसींची स्वतंत्र असलेली ओळख पुसण्याचा काम राज्याचे मंत्री विजय वड्डेटीवारांनी करीत काँग्रेस ही नेहमीच ओबीसी विरोधी असल्याचे या शासन निर्णयाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.१७ फेबुवारीला काढलेल्या शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.आधीच बहुजन कल्याण विभाग नावास ओबीसी समाजाने विरोध केलेला असताना त्याकडे दुर्लक्ष करीत सवर्ण समाजाला या विभागात समाविष्ठ करणे म्हणजे राज्यातील सरकार हे ओबीसींची स्वतंत्र ओळख पुसण्यासोबतच ओबींसींचा आजपर्यंत ज्यांनी हिस्सा हिसकावून आपला कब्जा केला त्या समाजाला यात सहभागी करुन घेणे म्हणजे उरले सुरले जे मिळतेय ते सुध्दा ओबीसीच्या तोंडातून हिरावून घेण्याचा प्रकारच म्हणण्याची वेळ आली आहे.





