तिरोडा,दि.17:- ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाच्यावतीने जनगणनेत ओबीसींचा रकाना तयार करण्यात यावा या मागणीसाठी निघालेल्या यात्रेचे तिरोडा तालुक्यात रविवारला दि.१६ ला आगमन झाले.तालुक्यातील सुकडी,मेंढा,बिरसी,वडेगाव,मुंडिकोटा,तिरोडा,कवलेवाडा,अर्जुनी,मांडवी येथील बाजार चौकात नुक्कड सभा घेत जनगणनेची आवश्यकता का आहे याची माहिती देण्यात आली.ओबीसी जनगणना जागृती रॅलीचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे हे करीत असून सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डाॅ.खुशाल बोपचे,सहसचिव खेमेंद्र कटरे,युवा समिती अध्यक्ष मनोज चव्हाण,ओबीसी संघर्ष समितीचे कैलाश भेलावे,कमल हटवार,एस.यु.वंजारी,संतोष वैद्य,जिल्हा सचिव वाय.टी.कटरे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष
राधेलाल पटले,सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिशुपाल पटले,राजु चामट,ए.डी.शरणागत,होमेंद्र कटरे,विजय बघेले,ओम पटले,बी.एच.चौधरी,नोकलाल शरणागत,एम.आर.पारधी,ए.तुषार ढोमणे, पी.टी.रंगारे,शितल कनपटे,नरेंद्रआगाशे,राजु गाढवे,पी.आर.पारधी,विजय पारधी,बलीराम दमाहे,राजेंद्र ढेंगे,शालिक ढेंगे,रवि मुटकूरे,सरपंच अनिता नागपूरे,वडेगाव सरपंच तुमेश्वरी बघेले, वाय.बी.चव्हाण, प्रा.राजे़द्र पटले,विकास भांडारकर,चांदोरीचे परमानंद खेवले,पी.टी.ढोमने,आर.एस.ठाकरे , सहमान्यवर उपस्थित होते.दरम्यान मुंडीपार येथील शांताबाई कारेमोरे विद्यालयातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वडेगाव, मुंडीकोटा,मुंडीपार येथील सभेत बोलतांना जिल्हाध्यक्ष बबलू कटरे म्हणाले की,सविंधानिक लढाई आमची आहे घटनेच्या ३४० व्या कलमानुसार आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे असी तरतुद असताना आमची मात्र जनगणनाच केली गेली नाही.जनगणना न झाल्याने शिक्षणात,नोकरीसह संसद व विधानसभेत हिस्सा मिळाला नाही.संख्येच्या आधारावर हिस्सा मिळत असताना आमची मात्र संख्याच मोजली गेली नाही.मेरीटच्या आधारावर हिस्सा मिळत नाही हे समाजाने जानून घेण्याची वेळ आली आहे व जनगणना होणे हा आमचा अधिकार आहे.आम्ही सर्वांनी राजकीय पक्ष बाजुला सोडून आपल्या हक्कासाठी संघटित व्हावे लागेल.सविधानांतील तरतुदीनुसार आमची जनगणना करायला हवे असे म्हणाले.
सुकडी,तिरोडा,कवलेवाडा येथील नुक्कड सभेत बोलतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे यांनी गोर्या इंग्रजानी जनगणना केली परंतु या देशातील काळ्या इंग्रजांनी मात्र ओबीसीची जनगणना टाळल्याचा उल्लेख करीत स्वातंत्र्यानंतर 72 वर्षात ओबीसींची जनगणना न होण्यास या देशातील केंद्रसरकार जबाबदार असल्याचे सांगितले.ओबीसींची जनगणना होऊन आकडे समोर आल्यास सवर्णांची पोलखोल होणार या भितीनेच जनगणना होत नसल्याचाही उल्लेख केला.कमल हटवार यांनी येथील राजकीय नेते ओबीसींच्या जनगणनेसाठी आवाज उठवू न शकल्याने आणि पक्षाच्या गुलामीत राहिल्याने ही वेळ आल्याचे म्हणाले.तर मनोज चव्हाण यांनी युवकांच्या व शेतकर्याच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे असून जनगणना झाल्यास लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद होऊन उद्याेगातही संधी मिळू शकते असे म्हणाले.यावेळी पी.डी.चव्हाण,शिसुपाल पटले,वाय.टी.कटरे यानीही विचार व्यक्त केले.संचालन राजू चामट,बी.एच.चौधरी,ए.डी.शरणागत यांनी केले.तिरोडा तालुक्यातील ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवासंघासह बहुजन संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.




