राज्यातील २५ उपनिबंधकांच्या बदल्या

0
39

गोंदिया,दि.३०: राज्याच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने शनिवारी राज्यातील सहकारी संस्थांमधील गट “अ” च्या २५ उपनिबंधकांच्या बदल्या केल्या आहेत. गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक जयेश आहेर यांची संगमनेर येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर नागपूरचे प्रादेशिक उपसंचालक(साखर) एम.सी. पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या राज्य सरकारने विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु केला आहे. आज महत्वाच्या सहकार क्षेत्राशी निगडित उपनिबंधकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई येथील संहकारी संस्थेचे(दुग्ध)उपनिबंधक एस.एस.आमने यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेडचे उपनिबंधक म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई येथील संहकारी संस्थांच्या(दुग्ध) विभागीय उपनिबंधक मीना आहेर यांची नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तांच्या अधिनस्थ सहकारी संस्थांच्या उपनिबंधक म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपनिबंधक प्रशांत सोनवणे यांना राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथे उपनिबंधक/ उपसरव्यवस्थापक म्हणून पाठविण्यात आले आहे. पुणे येथील सहकारी संस्था मुख्यालयाचे उपनिबंधक ए.जी.चाळक यांची महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे येथे उपनिबंधक म्हणून बदली करण्यात आली आहे. श्री.चाळक यांच्या जागेवर पुणे शहर सहकारी संस्थांचे उपनिबंधक व्ही.पी.पाटील यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय पुणे शहर सहकारी संस्थांचे उपनिबंधक एस.एन.जाधव यांची बदली सांगलीचे जिल्हा उपनिबंधक म्हणून झाली आहे. नागपूर येथील प्रादेशिक उपसंचालक(साखर) एम.सी.पाडवी यांची गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक म्हणून बदली झाली असून, गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक जयेश आहेर यांची अहमदनगर जिल्हयातील संगमनेर येथे सहकारी संस्थांचे उपनिबंधक म्हणून पाठविण्यात आले आहे. नागपूर शहर-३ च्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधक ज्योती शंखपाल यांचे पुणे येथील पणन संचालनालयात उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य उपनिबंधकांचाही बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.