‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान सुरू ,सर्व प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्यात:- डॉ वेणुगोपाल पंडित

0
11

धर्माबाद :- राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्ह्यात नवरात्रोत्सव काळात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविणे सूरु असुन त्याच धर्तीवर धर्माबाद ग्रामीण रुग्णालय येथे अभियानास सुरुवात झाली आहे धर्माबाद शहरातील व तालुक्यातील १८ वर्षावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी, विविध समस्यांबाबत समुपदेशन केले जात आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालये अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित यांनी आज माहिती दिली.खेड्यापाड्यातील असुशिक्षित तर शहरातील सुशिक्षित मातांकडून अनपेक्षितपणे दररोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बऱ्याच चुका होत असल्याने घरातील प्रमुख व्यक्ती आजारी पडते. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे घरातील प्रमुख जबाबदारी सांभाळणारी माता हिचे आरोग्य चांगले राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाकडून २६ पासून ५ ऑक्टोबर या नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान जिल्ह्यात राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच विविध आरोग्य विषयक समस्यांसाठी दिनांक 30 सप्टेंबर शुक्रवारी रोजी तज्ञ डॉक्टरांसह विविध तज्ञ व्यक्तींकडून गरोदर माता च्या सर्व प्रकारच्या रक्त तपासणी छातीचे क्षकीरण (एक्स-रे) सह इतर तापसण्या मोफत करण्यात येणार आहेत.या मोहिमेत १८ वर्षावरील सर्व स्त्रियांची, मातांची आरोग्य विषयक तपासणी, गरोदर महिला, बालकांची आरोग्य तपासणी, रक्त चाचण्या, लसीकरण, गर्भधारणा पूर्व काळजी, जननक्षम जोडपी यांना कुटुंब कल्याण कार्यक्रमाबाबत माहिती, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना पाळणा लांबवणे, मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. महिलांच्या गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सर तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अति जोखमीच्या माता, बालके यांना संदर्भ सेवा देऊन तज्ञामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. हे अभियान ३०तारखेला शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत राबवले जाणार आहे. यात विविध महाविद्यालयांमध्ये मुलींचे समुपदेशन केले जाणार असून निरोगी आयुष्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून आजारी विद्यार्थ्यांवर उपचार केले जाणार आहेत. तरी धर्माबाद तालुक्यातील व शहरातील माता भगिनींनी या शिबार उपस्थित राहुन तपासणी करून घ्यावी अशे आव्हान ग्रामीण रुग्णालये वैद्यकीय अधीक्षक डॉ वेणुगोपाल पंडित यांनी केले आहे.