आमदार रमेश बोरनारे यांची गाडी अडवल्याने पोलिसांसोबत वादावादी

0
8

औरंगाबाद-विभागीय आयुक्तालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीसाठी जाणाऱ्या आमदार रमेश बोरनारे यांची गाडी पोलिसांनी अडवल्याचा प्रकार बुधवारी घडला. यामुळे आधी बोरणारे यांच्या वाहन चालकाने आणि नंतर आमदार बोरनारे यांची पोलिसांसोबत जोरदार वादावादी झाली.

सर्व आमदारांच्या गाड्या विभागीय आयुक्तालयात जाऊ दिल्या. मात्र, आपली गाडी जाणून-बुजून थांबवण्यात आली, असा दावा यावेळी आमदार बोरनारे यांनी केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सर्वांची गाडी जाऊ दिली

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023-24 च्या आराखड्याची बैठक अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होत आहे. या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकरी उपस्थित राहिले आहेत. यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या ड्रायव्हरचा आणि पोलिसांसोबत वाद झाला.त्यानंतर स्वतः आमदार रमेश बोरनारे यांनी तिथे येऊन पोलिसांशी वाद घातला. सर्व आमदारांची गाडी आतमध्ये जाऊ दिली जात असताना, माझी गाडी का लावतात, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घातला.

पोलिस आयुक्त घटनास्थळी

बुधवारी सकाळी 11 वाजता बोरनारे यांचा ड्रायव्हर विभागीय आयुक्त कार्यालयात गाडी घेऊन जात होता. यावेळी पोलिसांनी त्याला विचारणा केली. त्याचा पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत आमदार रमेश बोरनारे या ठिकाणी हजर झाले. पोलिसांना केवळ माझीच गाडी अडवली, असा दावा त्यांनी केला. इतर आमदारांच्या गाड्या गेल्या असताना आमच्या सोबतच असे का, असा जाब त्यांनी त्यांनी पोलिसांना विचारला. त्यानंतर पोलिस आयुक्त निखिल गुप्ता हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनतर हा वाद मिटला.

शिंदे गटाचे आमदार

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल आपल्यालाही कसलिही तक्रार नाही, पण त्यांच्याभोवतालीचे जार बडवे यांनी शिवसेनेचे वाटोळे केले, असा दोषारोप गुवाहटीवरून औरंगाबादमध्ये आल्यानंतर गेला होता. काही दिवसांपूर्वी महालगाव येथेही त्यांची कार्यकर्त्यांशी वादावादी झाली होती.

महालगावमध्येही झाली वादावादी

आमदार बोरनारे शिंदे सेनेसोबत गेले. त्यानंतर त्यांनी महालगाव येथे एका दुकानाच्या उदघाटनाला हजेली लावली. यावेळी त्यांनी माजी पंचायत समितीच्या सदस्यांची घरी जात भेट घेतली. तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात लाठ्या-काठ्या घेत ते आक्रमक झाले होते. तेव्हा बोरनारे यांनीही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली होती. त्यावेळेसही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.