क्रांती घडविण्याची ताकद शिक्षणातचं आहे -उपाध्यक्ष इंजि. गणवीर यांची ग्वाही

0
13

स्नेह संमेलन उत्साहात

ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांचा सत्कार

अर्जुनी /मोर ता.25 :-शिक्षणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो कारण क्रांती घडविण्याची ताकद शिक्षणातच आहे अशी ग्वाही गोंदिया ज़िल्हापरिषदेचे उपाध्यक्ष इंजिनियर यशवंत गणवीर यांनी दिली.
येरंडी /दर्रेच्या प्राथमिक शाळेत आयोजित बालक्रीडा सांस्कृतिक महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनात ते उदघाटक म्हणून (ता.25)बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच करणदास रक्षा हे होते. मंचावर अर्जुनीमोरच्या सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुसतोडे, सदस्य चंद्रकला ठवरे, भाग्यश्री सयाम, माजी सरपंच मनिषा शहारे, सोनिया वाढई आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना इंजि. गणवीर म्हणाले की अवाढव्य लोकसंख्या आणि महागाई यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. असं असलं तरी पालक आपल्या बाळाच्या शिक्षणासाठी काहीही करण्यास अग्रेसर असतो.त्यांनी मानव विकास राज्य परिवहन बसचा वापर करून विद्यार्थ्यांनी शाळेत नेहमीच उपस्थित राहण्याचे आवाहन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आदर्श विद्यार्थी व्हावे असे सांगून तंबाखू खर्रा यांच्या पासून दूर राहण्याची तंबी दिली. याप्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी ही आपले विचार मांडले.यावेळी पाहुण्यानंचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत येरंडी /दर्रे चे ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी शाळेची जिर्ण इमारत पुनरजीवित करून विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय सहकार्य केल्याबद्दल उपाध्यक्ष इंजि. गणवीर यांच्याहस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन गावकऱ्यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन करून शिक्षक संचित वाढवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या येशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामू फरदे आणि वनसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.