अपंग, हतबल पुतण्यास चुलता शेती देईना;मारहाणीसह जीवे मारण्याचा प्रयत्न

0
1
चिमुकल्यासह आमरण उपोषण सुरु
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) – पारधी समाजातील अपंग व हतबल असलेले वडील त्यांची दोन्ही मुले म्हणजे पुतणे यांना त्यांची वडीलोपार्जित असलेली जमीन चुलते त्यांना कसू देत नसल्यामुळे त्यांनी पोलिसाकडे वारंवार दाद मागितली. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे अपंग असलेल्या व हतबल झालेल्या पुतण्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आई व चिमुकल्यासह कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे चुलत्याने अपंग असलेला चुलत्याचा भाऊ व त्यांच्या एका सुनेला गेल्या ४ दिवसांपासून गायब केले आहे. त्यांना न्याय द्यावा एवढीच एक मापक आशा व अपेक्षा या आमरण उपोषण करणाऱ्या अपंग हतबल व चिमुरड्यांना लागून राहिली आहे.
भूम तालुक्यातील गोलेगाव येथील आदिवासी पारधी समाजातील झुंबर मोहन शिंदे यांची गोलेगाव शिवारामध्ये दोन एकर बागायत शेती आहे. मात्र ती शेती त्यांचा भाऊ शंकर शिंदे व त्याची मुले शहाजी शिंदे, सुनील शिंदे, गोपीनाथ शिंदे, अरुण शिंदे व लाला शिंदे हे शेती कसू देत नाहीत. विशेष म्हणजे यंदा शेतात असलेले सोयाबीन देखील अद्यापपर्यंत त्यांनी त्यांना काढू दिलेले नाही. त्यांना सतत मारहाण करण्यासह गावातून हाकलून दिले जात आहे. जर तुम्ही गावात राहिला तर तुम्हाला जिवंत मारले जाईल अशी धमकी देत आहेत. त्यांची शेती त्यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला असून ती शेती त्यांना देण्यात यावी व त्यांच्या त्रासापासून त्यांची सुटका करावी या मागणीसाठी त्यांनी पोलिसाकडे वारंवार तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. तसेच आमरण उपोषणाला बसणार असे समजताच त्यांनी झुंबर मोहन शिंदे व त्यांच्या एका सुनेला चार दिवसांपासून गायब केले आहे. त्यांचा शोध घेऊन त्या कुटुंबाला संरक्षण देण्यासह त्यांची जमीन परत मिळवून द्यावी या मापक मागणीसाठी त्यांचा लढा सुरू आहे. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार करण्याचे त्यांच्या व चुलत भावाचे सत्र सुरू झाले आहे. ते थांबवावे यासाठी लक्ष्मण झुंबर शिंदे, आई दुलाबाई झुंबर शिंदे, मोहन झुंबर शिंदे, रामा झुंबर शिंदे, व इतर ३ चिमुकल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.