जिल्हास्तरीय लोकशाही दिनाची बैठक संपन्न

0
3
वाढदिवसाच्या शुभेच्छा

धाराशिव,दि.1: लोकशाही दिनाच्या निमित्ताने नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकशाही दिनी प्रत्येक विभागाने त्यांच्या अंतर्गत प्राप्त तक्रारींवर तत्काळ योग्य ती कार्यवाही करून निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आहेत.

 यावेळी  सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले, कार्यकारी अभियंता व्ही.डी.पोतदार, शरद माळी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.